पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न विचारण्यात आला.
अनिल परब यांनी पुण्यात ७० गँग सक्रिय असल्याचा दावा केला .
पत्रकार परिषदेत महायुती मधील राजकारण आणि निलेश घायवळ यावर प्रश्न विचारताच मोहोळ यांचा काढता पाय
अक्षय बडवे, साम प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून पुणे शहराचे नाव गुन्हेगारीमुळे खूप चर्चेत आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा निर्माण झालाय. त्यात पुण्यात गुंडांच्या ७० गँग सक्रिय असल्याचं ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी दावा केलाय. दुसरीकडे भाजप खासदार मात्र त्यावर साधं बोलण्यास तयार नाहीत. पत्रकारांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारीवरून प्रश्न करताच खासदार मुरलीधर मोहोळ यांनी स्टेज सोडला.
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार मुरलीधर मोहोळ बोलत होते. पत्रकार परिषदेतेचा विषय काय हे सांगितल्यानंतर पत्रकार परिषद सुरू झाली, त्यानंतर प्रश्नोत्तरे सुर झाली. त्यावेळी पुण्यातील पत्रकारांनी शहरातील वाढती गुन्हेगारी आणि राजकारणावर प्रश्न विचारला. त्यावेळी खासदारानी जबाबदार नेत्याप्रमाणे उत्तर देणं अपेक्षित होतं.
पण खासदार साहेबांनी उत्तर न देतात उडवा उडवीची उत्तरे देत प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. पत्रकार वारंवार प्रश्नाचे उत्तर मागत होते. शहरातील महत्त्त्वाचा प्रश्न आहे, असं पत्रकार म्हणत होती. पण खासदार मोहोळ उत्तर न देता पत्रकार परिषदेतून निघून गेले. महायुतीमधील राजकारण आणि निलेश घायवळ यावर प्रश्न विचारण्यात आला होता.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवार सुरू आहे. जिल्ह्यात ७० गँग कार्यरत आहेत. खंडणी, खून, दरोडेखोरी, खुनाचे प्रयत्न हे प्रकार सर्रास घडताहेत. हे करण्यासाठी जे लागत, म्हणजे सरकारचं पाठबळ आयतं मिळतं. हे सिद्ध झाल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय. काही दिवसापासून निलेश घायवळ प्रकरण चर्चेत आहे.
हा गुंड सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर गेला. त्याचे गुंड थैमान घालत आहेत. गोळीबार करत आहेत. त्याच्याच भावाला सचिन घायवळला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजुर केल्याचा आरोप आमदार अनिल परब यांनी केला.
नाशिक पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलीय. पोलिसांनी काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपींचा माज उतरवलाय. सातपूर गोळीबार प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं. सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींनी पोलिसांसमोर कबुली दिली. आरपीआय आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक लोंढेसह अन्य आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.