Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: हुंड्यासाठी सासूकडून छळ, उच्चशिक्षित महिलेची आत्महत्या; पुणे पुन्हा हादरले

Pune Police: पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणासारखीच आणखी एक घटना घडली आहे. विवाहितेने सासूच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. हडपसरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यातल्या मावळमध्ये वैष्णवी हगवणे या महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात एकापाठोपाठ एक अशाच प्रकारच्या घटना समोर येत आहेत. हडपसरमध्ये सासूकडून हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून उच्चशिक्षित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. या महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी सासूविरोधात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहित तरुणी दीपिका प्रमोद जाधवने (२९ वर्षे) आत्महत्या केली. घरात दोन चिमुकल्या मुलांना ठेवत या महिलेने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री हडपसर येथील हांडेवाडी रस्ता परिसरात घडली.

दीपिका प्रमोद जाधवने सासूच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या सासूविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपिकाची सासू द्वारका जाधवविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि क्रूर वागणूक देणे या कलमानुसार काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपिकाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

दीपिका आणि प्रमोद यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. दीपिकाने कृषीविषयक पदवी मिळवली होती आणि ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तिचा पती एका सरकारी कार्यालयात लिपी पदावर काम करतो. दीपिकाला दोन मुले आहेत. लग्न झाल्यापासून दीपिकाची सासू तिचा छळ करत होती. लग्नामध्ये हुंडा कमी दिल्यामुळे तिची सासू तिला नेहमीच टोमणे मारायची. पैसे आणि सोन्यासाठी ती दीपिकाचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करत होती. याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. काळेपडळ पोलिसांनी दीपिकाच्या सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking News : देवीच्या दर्शनावेळी चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Attraction to toxic men: मुली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? 'ही' 6 मानसिक कारणं समजून घ्या

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT