pune cctv x
मुंबई/पुणे

Pune : नोकरीवरुन काढल्याचा राग, सुरक्षारक्षकावर आधी चाकूने हल्ला, मग वीट उचलली अन्... घटना सीसीटीव्हीत कैद

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोसायटीच्या गेटवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Yash Shirke

Pune Crime : पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत आहेत. शुल्लक कारणांमुळे मारहाण होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुणे शहरानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. कामावरुन काढल्यावरुन रागाच्या भरात एका व्यक्तीने सोसायटीच्या गेटवरील सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील शांतीवन सोसायटीत सुदाम कामिठे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. ते गेटवर असताना एकजण सोसायटीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्या व्यक्तीला विचारपूस करण्यासाठी सुदाम कामिठे पुढे गेले. बोलताना अचानक आरोपीने सुदाम यांच्यावर चाकूने हल्ला केला.

घुसखोराला थांबवताना सुरक्षारक्षक सुदाम कामिठे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी त्यांनी शेजारी असलेल्या टेबलावरची वीट उचलली आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने हातातील वीट हिसकावली आणि त्याच विटेने सुदाम यांच्या डोक्यावर जोरात हल्ला केला. ही संपूर्ण घटना सोसायटी गेटवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली.

शांतीवन सोसायटीमध्ये घुसून सुदाम यांच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव राम लोंढे असे आहे. तो याआधी शांतीवन सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे काम करायचा. तो व्यसनाधीन असल्यामुळे त्याला नोकरीवरून काढण्यात आले होते. याच रागात त्याने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुरक्षारक्षकावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी आरोपी राम लोंढेला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Formula : व्याजाचा बोजा नाही, ईएमायचं टेन्शन नाही; बजेटमधील गाडी घेण्यासाठी 'हा' फॉर्म्युला वापरा

Maharashtra Live News Update : कंत्राटी आरोग्य कर्मचारी पंधरा दिवसापासून बेमुदत संपावर

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टची गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Ambajogai News : अंबाजोगाईच्या तरुणाने बनवली 'सायबर बंधू' वेबसाइट; गैरवापराला बसणार आळा

Oldest fort in India: भारतातील सर्वात जुना किल्ला कोणता आहे?

SCROLL FOR NEXT