Pune x
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Pune Crime : पुण्यात एक खळबळजनक घटना घडली. दारू पिण्यासाठी एका तरुणाने त्याच्या आईकडे पैसे मागितले. आईने नकार दिल्याने तरुणाने त्याच्या आईवर जीवघेणा हल्ला केला.

Yash Shirke

  • दारुसाठी तरुणाचा आईवर जीवघेणा हल्ला

  • तरुणाने आईवर केले चाकूने सपासप वार

  • पुण्यातील भयंकर प्रकार समोर

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणाने त्याच्या आईवर जीवघेणा हल्ला केला. तरुणाने चाकून सपासप वार करत आईला जखमी केले. हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी पर्वती पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा कांबळे (वय ३० वर्षे, राहणार सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तर कौशल्या कांबळे (वय ५५ वर्षे) असे तरुणाच्या आईचे नाव आहे. आरोपीचा मोठा भाऊ बाबासाहेब याने या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीला अटक झाली आहे.

आरोपीला दारुचे आणि अन्य गोष्टींचे व्यसन आहे. तो नोकरी किंवा काही कामधंदा करत नाही. तो आईच्या पैशांवर उदरनिर्वाह करतो. दारु पिण्यासाठीही तो आईकडून पैसे घेत असे. दारुसाठी पैशांची मागणी करुन आरोपी आईला त्रास द्यायला. पैसे न दिल्यास आरोपी कृष्णा हा त्याच्या आईशी गैरवर्तन करत असे, तिला शिव्या देत असे.

गुरुवारी (१४ ऑगस्ट) पहाटे चार-साडेचारच्या सुमारास आरोपी कृष्णाने त्याच्या आईवर चाकूने सपासप वार केले. त्यांच्यामध्ये दारु पिण्यासाठी पैसे देण्यावरुन वाद झाला होता. आरोपीने त्याच्या आईच्या छातीत चाकूने भोसकले. हल्ल्यामध्ये आरोपीची आई कौशल्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यानंतर कृष्णा पसार झाला. कौशल्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारीनंतर कृष्णाला पोलिसांनी अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT