Humanity Betrayed for Property Saam TV News
मुंबई/पुणे

वडिलांच्या संपत्तीसाठी मुलगा हैवान, जन्मदात्या आईला वृद्धश्रमात अन् बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये धाडलं | Pune

Humanity Betrayed for Property: पुण्यातील सिंध सोसायटीमध्ये भावाने वडिलोपार्जित मालमत्तेसाठी बहिणीला मानसिक रुग्णालयात आणि वृद्ध आईला वृद्धाश्रमात डांबल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला अटक झाली आहे.

Bhagyashree Kamble

सचिन कदम, साम टिव्ही प्रतिनिधी

माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुण्यातून समोर येत आहे. वडिलोपार्जित मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी भावानं चक्क बहिणीला जबरदस्तीनं मानसिक रूग्णालयात दाखल केलं. नंतर आईला वृद्धाश्रमात ठेवलं. ही धक्कादायक घटना सिंध सोसायटी परिसरात घडली असून, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र इंदूर राय असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील चेंबूर भागात राहत होता. त्याचा वडिलोपार्जित मालमत्तेवर डोळा होता. यासाठी त्यानं आई आणि बहिणीवर अत्याचार केला. वडिलोपार्जित मालमत्तेवर जबरदस्तीनं ताबा मिळवण्यासाठी त्यानं कटकारस्थान रचलं.

बहिणीची मानसिक स्थिती पूर्णपणे स्थिर असतानाही, तिला मानसिक रूग्णालयात नेलं . नंतर बाउन्सर महिलांना आणून त्यानं बहिणीच्या डाव्या हातात इंजेक्शन दिलं. 'रक्त तपासणीसाठी नेतो आहे' असं सांगत त्यानं बहिणीला मेण्टल हॉस्पिटलमध्ये भरती केली. नंतर त्यानं आईची कोणतीही परवानगी न घेता जबरदस्तीनं वृद्धाश्रमात नेलं.

तिथं त्यानं वृद्ध आईला दाखल केलं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी तरूणीला मेण्टल हॉस्पिटलमधून मुक्त केलं. बहीण लगेच घरी परतली. मात्र, धर्मेंद्रनं घरात तिला प्रवेश नाकारला. अखेर तिनं थेट चतु:श्रृंगी पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज हांडे यांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

तसेच चार अनोळखी महिला बाउन्सरविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Travel Tips: दिवाळीत ट्रेनमधून प्रवास करताय? या वस्तू चुकूनही घेऊन जाऊ नका

Gujarat News : गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड; 10-11 मंत्र्यांचा राजीनामा, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला मिळणार महत्वाची जबाबदारी

Maharashtra Live News Update: अलिबाग येथील RCF कंपनी विरोधातील शिवसेनेने सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

Nashik Crime: गुन्हेगारी रॅपरची जिरवली; टक्कल करत काढली धिंड, कोयत्याची भाषा करणाऱ्याला चालताही येईना

Farmer Rasta Roko : चोपडा तालुका मदतीपासून वगळला; बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको

SCROLL FOR NEXT