पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये २३ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या.
मध्यरात्री वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळलं.
मृत विद्यार्थिनीचे नाव ज्योती मीना, ती राजस्थानची रहिवासी.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू.
BJ Medical College girl hangs herself in hostel room : पुण्यातील प्रतिष्ठित बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरकीचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरूणीने मध्यरात्री आयुष्याचा दोर कापला. हॉस्टेलमध्ये मध्यरात्री दोन वाजता गळफास घेत डॉक्टर तरूणीने आत्महत्या केली. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मूळची राजस्थानची असलेली ज्योती मुलींच्या वस्तीगृहात राहत होती. मध्यरात्री ज्योतीने टोकाचे पाऊल का उचलले? ज्योतीची आत्महत्या आहे की हत्या? याबाबत तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती ही मूळची राजस्थानमधील आहे, ती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री तिने आयुष्याचा दोर कापला. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास वसतिगृहातील तिच्या खोलीत तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. वसतिगृहातील विद्यार्थीनीच्या ही घटना लक्षात येताच तातडीने पोलिसांना आणि महाविद्यालय प्रशासनाला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह घेतला. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून ज्योतीचा मृत्यदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३) ही पुण्यामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अभ्यासाचा ताण, वैयक्तिक समस्या किंवा इतर काही मानसिक तणाव यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना ज्योतीच्या खोलीमधून कोणताही नोट मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.
पोलिसांकडून ज्योतीच्या मित्र-मैत्रिणीचे जबाब नोंदवण्यात येत आहे. बीजी मेडिकल कॉलेजकडून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. ज्योतीच्या मोबाइल फोन आणि वैयक्तिक वस्तूंची तपासणी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.