Yerwada Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: सुसंस्कृत पुण्यात विकृतीचा कळस! फुटपाथवर राहणाऱ्या भिकारी महिलेवर अत्याचार; रात्री लघुशंकेसाठी गेली अन्...

Pune Crime News: या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात असून नराधमांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे....

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे (Pune) शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. खुन, मारामाऱ्या या घटनांनी पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले असतानाच एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर भिक्षा मागून उदरर्निवाह करणाऱ्या महिलेवर फूटपाथवर (Footpath) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी या भीक मागून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. फुलेनगर येथील आरटीओ ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात त्या कुटुंबासह राहतात. 25 एप्रिलच्या रात्री त्या जेवण करुन फूटपाथवर झोपल्या होत्या. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या लघुशंकेसाठी गेल्या असताना एका आरोपीने त्यांना पकडून जबरदस्तीने त्यांच्यावर अत्याचार केले.

आरटीओ ऑफिस शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात 25 आणि 26 एप्रिलच्या रात्री हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यात लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. रोज अनेक नवीन घटना समोर येत आहेत. त्यामुळे या नराशमांवर कारवाई कधी होणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवच्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील पूल पाण्याखाली

IAS Mittali Sethi: कोण आहेत नंदुरबारच्या IAS मिताली सेठी? दोन्ही मुलांचे घेतलेय सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन

Love Rashifal: नात्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता, अविवाहितांना मिळेल प्रेम

Surya Grahan 2025 : सर्वपितृ अमावस्येला लागणार वर्षातील शेवटचं ग्रहण; जाणून घ्या तारीख आणि सूतकाची वेळ

Daily Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींच्या करियरला कलाटणी मिळेल, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT