Pune Crime x
मुंबई/पुणे

Pune Crime : बदला तो फिक्स... म्हणत आंदेकर टोळीच्या समर्थनात बनवले रिल्स, पोलिसांच्या नजरेस पडताच करेक्ट कार्यक्रम

Pune News : पुण्यातील आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या तरुणांची धिंड काढली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Yash Shirke

  • 'बदला तो फिक्स' म्हणत आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणाऱ्यांवर कारवाई

  • पुण्यातील आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या प्रति पाठिंबा देणाऱ्या रिल्स सोशल मीडियावर शेअर

  • रिल्स, स्टेटस शेअर करणाऱ्या, गुन्हेगारीस प्रवृत्त करणाऱ्यांची पुणे पोलिसांनी काढली धिंड

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहर आणि आसपासच्या भागात गुंडांचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. आंदेकर टोळी, निलेश घायवळ टोळी यांच्यामध्ये सुरु असलेला संघर्ष, त्यांच्या कारवायांमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या टोळ्यांमध्ये तरुण मुलांचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय टोळ्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

पुण्यातील आंदेकर टोळीला समर्थन करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला. आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या प्रति पाठिंबा देणाऱ्या रिल्स अपलोड करणाऱ्यांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी चार ते पाच जणांची पोलिसांनी धिंड काढली. या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीचे समर्थक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आंदेकर समर्थनार्थ बदला तो फिक्स है... रिप्लाय होगा. आता फक्त बॉडी मोजा.. अशा प्रकारे अनेक स्टेट्स आणि स्टोरी अपलोड करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे आणि ओंकार मेरगु यांना अटक केली आहे.

पुण्यात अनंत चर्तुदर्शीच्या आदल्या दिवशी आयुष कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली होती. मागच्या वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या भाच्याला आयुष कोमकरला संपवण्यात आले. आयुषवर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यातील आंदेकर टोळीबाबत चर्चेला सुरुवात झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

SCROLL FOR NEXT