Pune Court x
मुंबई/पुणे

Pune: दारू पिऊन भररस्त्यात धिंगाणा, कोर्टाकडून आरोपींना अजब शिक्षा; तुरुंगात न पाठवता थेट...

Pune Court: पुण्यातील रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना पुणे न्यायालयाने अजब शिक्षा सुनावली. दोन्ही आरोपींना कोर्टाने तुरुंगात न पाठवता सामाजिक कार्य करण्याचे आदेश देत जन्माची अद्दल घडवली.

Priya More

Summary -

  • दारु पिऊन धिंगाणा करणाऱ्या तरुणांना कोर्टाने जन्माची अद्दल घडवली

  • दारू पिऊन पीएमसी परिसरात गोंधळ घालणाऱ्या दोन तरुणांना कोर्टाची अजब शिक्षा दिली

  • तुरुंगाऐवजी ४ दिवस दररोज ३ तास समाजसेवा करण्याचे आदेश कोर्टाने दिले

  • आरोपींना वाहतूक पोलिसांना मदत, पोलिस ठाण्यातील स्वच्छता, नागरी कर्तव्ये पार पाडण्यास सांगितले

अक्षय बडवे, पुणे

दारू पिऊन भररस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या दोघांना पुणे न्यायालयाने अजब शिक्षा दिली आहे. दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या या दोघांना न्यायालयाने तुरुंगवासऐवजी समाजसेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. पुणे न्यायालयाने दिलेल्या या निकालाची सर्वत्र चर्चा होत आहे. या दोन्ही आरोपींना कोर्टाने ४ दिवस दररोज ३ तास समाजसेवा करण्याचे आदेश दिले आहेत.

दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या दोघांना आता पोलिसांच्या देखरेखीखाली समाजसेवा करावी लागणार आहे. वाहतूक पोलिसांना मदत करणे, पोलिस ठाण्यातील स्वच्छता करणे यासह नागरी कर्तव्ये पार पाडणे अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी दोन्ही तरुणांना ही शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे दोन्ही आरोपींना जन्माची अद्दल घडली असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, २ डिसेंबर रोजी पुणे महानगरपालिका परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेमध्ये २ तरुणांनी गोंधळ घातला होता. या दोघांविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोघाना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले होते. सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी आरोपींना शिक्षा देण्याची न्यायालयाला विनंती केली.

दुसऱ्या बाजूला आरोपींचा हा पहिलाच गुन्हा असून त्यांच्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना तुरुंगवासाऐवजी समाजसेवेची शिक्षा सुनावली. दोन्ही आरोपींनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या देखरेखीखाली समाजसेवा करावी असे आदेश न्यायालयाने दिले.

न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमध्ये दोन्ही आरोपींना रहदारीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना नियमनात मदत करणे, पोलिस ठाण्यात स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे अथवा प्रोबेशन अधिकाऱ्यांनी नेमलेली नागरी कर्तव्ये पार पाडणे यापैकी अधिकाऱ्यांनी दिलेले योग्य कामे करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

Municipal Election : पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार? वाचा महापालिका निवडणुकीचे अपडेट

MSRTC Tours: लाल परी, लय भारी; पॅकेज टूरने एसटी झाली मालामाल, किती कमावले?

Maharashtra Winter Assembly: विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद

Ladki Bahin Yojana: अपात्र असतानाही ₹१५०० घेतले, कारवाई होणार का? आदिती तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT