pune court x
मुंबई/पुणे

Pune : दोनदा घटस्फोट, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; तरीही पुणे कोर्टाने दिली क्लीन चीट, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Pune News : एका महिलेने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर बलात्काराचे आरोप केले होते. या प्रकरणात पुणे न्यायालयाने कथित आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. महिलेने केलेले आरोप खोटे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Yash Shirke

पुण्यातून विचित्र प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील न्यायालयाने एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करण्याचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा आरोप या व्यक्तीवर त्याच्या पत्नीकडून करण्यात आला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. व्यक्तीच्या पत्नीने केलेले आरोप न्यायालयाने फेटाळले आहेत. दोघांमधील शारीरिक संबंध हे दोघांच्याही संमतीने झाले होते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार महिला आणि ज्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत, ती व्यक्ती यांचे २००२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. व्यक्तीने २०१० मध्ये तक्रारदार महिलेला घटस्फोट देत २०१२ मध्ये पुन्हा लग्न केले. २०१५ मध्ये न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला होता. घटस्फोटानंतर महिलेने देखील दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले. पण त्यांचे लग्न फक्त पाच महिने टिकले.

कथित आरोपी (तक्रारदार महिलेच्या पूर्वाश्रमीच्या पती) २०१९ मध्ये पुन्हा महिलेच्या संपर्कात आला. त्याने महिलेला पुन्हा लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने लग्नाबद्दल विचारल्यानंतर आरोपीने लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर महिलेने २०२० मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करत कलम ३७६(२)(एन) अंतर्गत आरोपीला अटक केली.

आरोपीने लग्नाचे आश्वासन दाखवत तिच्या संमतीशिवाय वारंवार बलात्कार केला, असा युक्तिवाद महिलेने केला. त्याला प्रत्युत्तर देताना आरोपीच्या वकिलांनी 'केवळ तक्रारदाराचा जबाब आरोपीविरुद्ध इतका गंभीर गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसा नाही. तक्रार दाखल करण्यास अवाजवी विलंब झाला आहे, ज्याचे कोणतेही स्पष्टीकरण नाही, असे म्हटले.

'फिर्यादी पक्षाला आयपीसीच्या कलम ३७६ (२) (एन) अंतर्गत गुन्हा सिद्ध करता आलेला नाही. असा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावेही नाहीत. समजा तक्रारदार आणि आरोपीमध्ये कोणतेही शारीरिक संबंध होते, तरीही त्यांना गुन्हा मानला जाणार नाही', असे म्हणत पुणे न्यायालयाने कथित आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda Sunita Divorce: गोविंदा आणि सुनीताच्या घटास्फोटवर वकिलाचा मोठा खुलासा; म्हणाले...

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद कोणता? जाणून घ्या खास नैवेद्याची संपूर्ण यादी

Ganesh Chaturthi 2025 : सुखकर्ता, दु:खहर्ता...; गणपतीच्या 'या' ५ आरत्या आताच करा तोंडपाठ

Supreme Court : सावधान! तुम्हीही कार-बाइकमध्ये 'हे' पेट्रोल टाकताय? प्रकरण थेट SC पर्यंत पोहोचलं

Maharashtra Live News Update: मुंबईला जाण्यापूर्वी बीडमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक सभा

SCROLL FOR NEXT