Pune Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime: गडावर रोमान्स करताना हटकलं, दुर्गप्रेमीला दगडानं ठेचलं; प्रेमी युगुल अटकेत

Pune Malhargad romance controversy: पुण्यातील सासवडमध्ये एका कपलनं मल्हारगडावर दुर्गप्रेमीवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी प्रेमी युगुलावर कारवाई करत अटक केली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील सासवडमध्ये एका कपलनं मल्हारगडावर दुर्गप्रेमीवर प्राणघातक हल्ला केला होता. दुर्गप्रेमीनं कपल रोमान्स करत असताना रंगेहाथ पकडलं. यानंतर संतापलेल्या कपलनं दुर्गप्रेमीवर दगडानं हल्ला केला. यात दुर्गप्रेमी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी प्रेमी युगुलावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

मल्हारगडावर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. माउंटन ट्रेल रेसचा सराव करणाऱ्या तरुणानं सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वेदांत जाधव आणि एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमोद जगताप हा दररोज माउंटन ट्रेल रेसचा सराव करतो. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून माउंटन ट्रेल रेसच्या सरावासाठी किल्ले मल्हारगडावर निघाला होते. यावेळी झेंडेवाडी बाजूकडील बुरुजाच्या तटबंदीच्या आडोशाला एक अनोळखी कपल बसले होते. आडोशाला बसून कपल अश्लील चाळे करत होते.

यावेळी जगताप यानं कपलला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर वेदांत जाधव यानं जगतापला 'गडकिल्ला तुझ्या बापाचा आहे का?' असे म्हणून धक्का देऊन पाठीत दगड मारला. नंतर तरूणीनं जगताप याच्या डोक्यात दगड मारायला सुरुवात केली. यात जगताप गंभीर जखमी झाला.

त्यानंतर जगताप रक्तबंबाळ अवस्थेत गडाखाली आला. मित्र कुंडलीक जाधव याला फोन करून बोलावून घेतले. तसेच सासवड पोलिस ठाण्यात दाखल होत या प्रकरणाची माहिती दिली. जगताप याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या कपलला सासवड पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT