Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग लग्नाचं आश्वासन देत इंजिनियर तरुणीवर बलात्कार

पीडित तरुणीच्या कंपनीमध्ये काम करणार्‍या व्यवस्थापकानेच या आयटी इंजिनियरवर बलात्कार केला आहे.

गोपाल मोटघरे

पुणे: पुण्यात अहमदाबाद येथून आलेल्या आयटी इंजिनियर तरुणीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. पीडित तरुणीच्या कंपनीमध्ये काम करणार्‍या व्यवस्थापकानेच या आयटी इंजिनियरवर बलात्कार केला आहे (Pune Company Manager Raped IT Engineer Girl).

याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दोन आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कुमार सिंह आणि मालव आचार्य असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत.

कंपनीच्या व्यवस्थापकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

पीडित तरुणी ही अहमदाबाद (Ahmedabad) येथून पुण्यात (Pune) आयटी कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी आली होती. त्यादरम्यान तिच्या कंपनीत काम करणाऱ्या व्यवस्थापकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. मी स्वतःच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट (Divorce) घेऊन तुझ्याशी लग्न करणार, असं आश्वासन पीडित तरुणीला देत आरोपी राहुल कुमार सिंहने पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर पीडित आयटी इंजिनियर (Engineer) मुलीने राहुल कुमार सिंह यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्यानंतर राहुल कुमार सिंहने त्याचा मित्र मालवा आचार्य याच्या मदतीने पीडित मुलीला बदनाम करण्याचा, तसेच तिला ठार मारण्याची धमकी दिली आहे. गुन्हा दाखल होताच राहुल कुमार आणि त्याचा साथीदार मालव आचार्य हे दोघेही फरार झाले आहेत. हडपसर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा सर्व प्रकार ऑक्टोबर 2020 ते जून 2021 दरम्यान घडल्याची माहिती आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT