सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune Civic Poll Row: राज्यातील महानगरपालिकेचे बिगुल वाजले असून राज्यभरातील अ, ब, क मनपाचे प्रारूप प्रभाग समोर आले आहेत. पुण्याच्या प्रभाग रचनेत यंदा थोडेफार बदल करण्यात आले आहेत. याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला होणार तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसणार असल्याचे बोलले जातेय. पुण्यातील प्रभाग रचनेवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील मध्यवर्ती प्रभाग 'जैसे थे उपनगरांत मात्र मोठे फेरबदल करण्यात आल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. सुभाष जगताप यांनी त्याबाबत आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्याशिवाय याबाबात अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता पुण्यावरून महायुतीमध्ये बिनसल्याची चर्चा आहे.
सुभाष जगताप यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजपने अनुकूल प्रभाग बनवले आहेत. शिवसेनेला फायदा होईल की नाही माहिती नाही, पण राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. यावर आम्ही हरकत घेणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यावर चर्चा करणार आहे. प्रभागरचना जाहीर झाली असून, यात शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागरचनेत मोठे बदल झालेले नाहीत. पण उपनगरांमधील प्रभागांत उलथापालथ झाली आहे.
पुणे शहरात समस्या आहेत विकसासाठी करायला हवं होत,ते सत्तेसाठी नाही. संपूर्ण प्रभागरचनाही भाजपला फायदेशीर ठरणारी आहे. काही प्रमाणात शिवसेनेला फायदा होणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदारांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने तोडण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी आहे. राज्य सरकारने महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने प्रभागरचनेत तिन्ही पक्षांच्या पदाधिकान्यांच्या सोयीचे प्रभाग होतील,अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर यावर फक्त भाजपचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले.
प्रभागरचना करताना करावा, पर्वती,कसबा कॅन्टोन्मेंट शिवाजीनगर या मध्यवतीं भागातील विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांची संख्या कमी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. उपनगरांतील प्रभाग मोठे केल्याने तेथील नगरसेवकांची संख्या वाढण्यावर मर्यादा आली आहे. त्याचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.