Bhide Bridge Pune Saam tv
मुंबई/पुणे

Pune Bhide Bridge : भिडे पूल कधी सुरु होणार? वाहतूक कोंडीने पुणेकर वैतागले; दहीहंडी, गणेशोत्सवाआधी प्रश्न सोडवण्याची मागणी

Bhide Bridge Pune: भिडे पूल लवकर सुरु करण्याची मागणी पुणेकरांनी केली आहे. दहीहंडी, गणेशोत्सवाआधी पूल सुरु करण्याची मागणी पुणेकरांनी केली आहे.

Akshay Badve

पुणे शहरातील बाबा भिडे पूल मेट्रोच्या कामामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. याचाच त्रास सामान्य पुणेकरांना होताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एका गणेश मंडळाने पुणे मेट्रो प्रशासनाला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी देणारे निवेदन दिलं आहे. येणारा काळ दहीहंडी तसेच गणेशोत्सवाचा आहे बाबा भिडे पूल बंद असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा ताण शहरातल्या मध्यवर्ती भागात नक्की होणार असं पुणेकरांचं म्हणणं आहे. त्यासोबतच या ठिकाणी होणाऱ्या पुलाच्या कामाच्या बाबत प्रशासनाकडून सुशोभीकरणावर खर्च केला जातोय मात्र नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जात नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. पुण्यातील डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या या पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे पुणेकर अक्षरशः वैतागले आहेत.

१८ एप्रिल रोजी पुण्यातील बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर ७ जून रोजी भिडे पूल आणखी दीड महिने बंद राहील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. बाबा भिडे पुलाजवळ पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या पुलाला जोडण्यासाठी एक पादचारी पुलाचं काम सध्या सुरू आहे. परिणामी त्या ठिकाणाच्या खालून जाणारा बाबा भिडे पूल हा बंद करण्यात आला आहे.

भिडे पूल बंद असल्यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळच्या सत्रात मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी होताना दिसते. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एरंडवणा गणेशोत्सव मित्र मंडळाने पुणे मेट्रो प्रशासनाला भिडे पूल लवकर सुरू करावा असे पत्र दिले आहे. मेडिकल बंद असल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे हा पूल चालू करावा अशी मागणी या मंडळाचे प्रशांत वेलणकर यांनी केली आहे.

भिडे पुलाच्या शेजारी असलेल्या पादचारी पुलाचे काम हे फक्त सुशोभीकरण आहे मात्र पुणेकरांच्या अडचणी दूर होणार नाहीत. तसेच खडकवासला धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग या पुलाच्या पिलरमुळे अडला जाऊ शकतो त्यामुळे या प्रमाणावर पाणी सुद्धा साठलं जाईल अशी खंत पुणेकरांनी व्यक्त केली आहे.

आगामी काळ हा सगळा सणासुदीच्या असल्यामुळे दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर नागरिक शहरातील पेठांमध्ये या पुलाचा वापर करून जातात. कामाला वेळ लागणार असेल तर या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तरी पादचाऱ्यांसाठी हा भिडे पूल सुरू करावा अशी मागणी पुणेकरांनी केली आहे.

पुणे शहरातील हा बाबा भिडे पूल शहरातील पेठांना आणि त्यासोबतच जंगली महाराज रस्ता आणि परविजन महाविद्यालय रस्ता या दोघांना जोडला जाणारा पूल आहे. पुलावरून दररोज हजारो गाड्यांची ये जा होत असते. आता हा पूल बंद असल्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होणार अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

दुसऱ्या बाजूला पुणे मेट्रोच्या वतीने उभारण्यात आलेला पुलाचे काम कधीपर्यंत होणार याबाबत पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारले असता या पुलाला आणखी दोन महिने लागणार असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप

Prajakta Mali: युनिव्हर्सिटी टॉपर ते टीव्ही होस्ट; प्राजक्ता माळीचा प्रेरणादायी प्रवास

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी ६ ग्रह येणार एकत्र; दुर्मिळ संयोगाचा ३ राशींना होणार भरपूर फायदा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

Kapil Sharma: सलमान खाननंतर कपिल शर्माला का टार्गेट करतेयं लॉरेन्स बिश्नोई टोळी? 'हे' आहे खरे कारण

SCROLL FOR NEXT