Pune News Saam
मुंबई/पुणे

Pune : कोंढव्यात भरधाव वाहनाने १३ वर्षाच्या मुलाला चिरडले, संतप्त जमावाने चालकाला फोडले

Minor Boy Crushed Under Car Driver Arrested: कोंढवा बुद्रुक परिसरात भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने एका १३ वर्षीय मुलाला चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यातील कोंढवा परिसरात अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. एका भरधाव चारचाकी वाहनाने एका १३ वर्षीय मुलाला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून, कार चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निवृत्ती बाजीराव किसवे (वय वर्ष १३) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना १८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास भोलेनाथ चौक परिसरात घडली. प्रत्यक्षदर्शींनुसार, इनोव्हा वाहन भरधाव वेगाने चालवले जात होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून पायी चालत असलेल्या निवृत्ती याला जोरदार धडक बसली. धडकेमुळे तो रस्त्यावर दूर फेकला गेला आणि जागीच मृत्यू झाला.

स्थानिक लोकांनी पाहताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चालकाला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. तसेच त्याच्या वाहनाचीही तोडफोड केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी तपास करून जैद नसीर शेख (वय वर्ष २३) या आरोपीला अटक केली. चालकाने मद्यप्राशन केले होते का? याचा तपास सध्या सुरू असून, कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. रस्त्यावरील वेग आणि वाहतुकीच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT