Pune Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात! कॅम्प परिसरात बांधकामस्थळी स्लॅब कोसळला, तरुणाचा जागीच मृत्यू

Pune Accident News : पुण्यामधील कॅम्प परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. बांधकामादरम्यान इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्यातील कॅम्प परिसरात दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला. स्लॅबचे काम सुरु असतानाचा स्लॅब कोसळला. यात एका युवकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बिल्डर राणावत-मेहता आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

कॅम्प परिसरातील साचापीर स्ट्रीटवर जुन्या ओयसिस हॉटेल शेजारी बांधकाम सुरु होते. बिल्डिंग क्रमांक ४९५/४९६ या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामस्थळी मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार कामगार गंभीर जखमी अवस्थेत आहेत.ही दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर बिल्डर राणावत व मेहता, तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी होत आहे.

या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कामगार हक्क कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी काही काळापूर्वीही एका कामगाराचा मृत्यू झाला होता, मात्र ती घटना दबवण्यात आल्याचा गंभीर आरोप आता करण्यात येत आहे. नरेश पुष्पावती इंद्रसेन जाधव व कार्यकर्ते दिनेश परदेशी यांनी उघडकीस आणली.

घटनेची माहिती मिळताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष अतिश भाऊ कुऱ्हाडे व शाखा अध्यक्ष उमेश कांबळे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण माहिती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी पाटील साहेब आणि साबळे साहेब यांना फोनवरून दिली. बांधकाम सुरु करताना कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या प्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करून जबाबदारांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT