Pune Afzal Khan’s Scene in Ganesh ustav Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्याला पोलिसांकडून परवानगी

पोलिसांनी या देखाव्याला परवानगी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टिव्ही

Afzal Khan’s Scene in Ganesh Ustav Pune : पुण्यातून (Pune) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात कोथरूड पोलिसांनी (Police) अखेर अफजलखान वधाच्या जिवंत देखाव्याला अखेर परवानगी दिली आहे. संगम गणेश मंडळाच्या वतीने या देखाव्यासाठी काही दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांकडून ती नाकारण्यात आली होती. यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, आता पोलिसांनी या देखाव्याला परवानगी दिली आहे. (Pune Todays News)

काय आहे प्रकरण?

पुण्यातील संगम गणेश मंडळाच्या वतीने गणपती उत्सवात अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. कोथरूड पोलिसांकडे ही परवानगी मागण्यात आली होती. मात्र पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली.

याविरोधात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ईमेल द्वारे परवानगी मिळवण्यासंबंधीची विनंती केली होती. (Pune Police Latest News)

इतकंच नाही तर, परवानगी मिळावी यासाठी गणपती मंडळाचे कार्यकर्ते 26 ऑगस्टपासून उपोषणाला देखील बसले होते. जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत उपोषणाला सुरू ठेवू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता.

दरम्यान, अफजल खान देखाव्याचा वाढता वाद पाहता, पुणे पोलिसांनी परवानगी नाकारण्याचे पत्र मागे घेतले असून संगम गणेश मंडळाला असा जिवंत देखावा करण्याची परवानगी अखेर देण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT