Pune News SaamTv
मुंबई/पुणे

Pune News : भंगाराच्या गॅरेजमध्ये भीषण स्फोट; एकाच दुर्दैवी मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Explosion In Scrap Shop : पुण्याच्या एका भंगार दुकानात झालेल्या स्फोटात इसमचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्याचा आवाज अर्धा किलोमीटर दूर ऐकू गेला.

Saam Tv

भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजचे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना पुण्याच्या बी.टी. कवडे रोड येथे घडली आहे. या घटनेत एकाच मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. महबूब शेख असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

भंगाराच्या दुकानामध्ये भीषणस्फोट झाल्याने एक इसम जागीच ठार झाला. तर तीन जर गंभीर रित्या जखमी झाले आहेत. या स्फोटाचा आवाज अर्धा किलोमीटर लांबपर्यंत ऐकू आला. त्यामुळे काहीकाळ परिसरात भितीचं वातावरण होतं. नेमकं काय झालं आणि आवाज कसला झाला हे नागरिकांना समजलं नाही. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

बी टी कवडे रोडवर पेट्रोलपंपा जवळ एक भंगाराचं दुकान आहे. या दुकानात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की अर्धा किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे नागरिकमध्ये भिंतीच वातावरण निर्माण झालं. या या घटनेत एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहे. जखमींना उपचार कामी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.

बी. टी. कवडे रस्त्यावर नवशा गणपती पुढे भंगार मालाचा साठा असणाऱ्या पञ्याचे शेडमध्ये फ्रिजमधील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचे उघड झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात बाजूला काही रिक्षा लावलेल्या होत्या त्या रिक्षांचेही नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT