Rajgurunagar Crime: Pune News : २ चिमुकल्यांच्या हत्येनंतर राजगुरूनगरात उसळली संतापाची लाट, नागरिकांचे आंदोलन

Rajgurunagar Minor Girls killed: पुण्यातील राजगुरूनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येनंतर पुण्यातील नागरीक आणि नातेवाईक संतप्त झाले असून, नागरीकांनी रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केलंय.
Rajgurunagar crime
Rajgurunagar crimeSaam Tv News
Published On

राजगुरूनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येनंतर पुण्यातील नागरीक आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. एका ५४ वर्षांच्या नराधमानं दोन बहि‍णींची हत्या केली आहे. आरोपी अजय दास हा हॉटेल वेटर होता. त्यानं एकीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नंतर बिंग फुटेल या भितीनं दोन्ही बहिणींची हत्या केली. ही बाब उघड झाल्यानंतर कुटुंबीय आणि नागरीकांनी संताप व्यक्त केला असून, काही ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

राजगुरुनगर शहरातील दोन चिमुकल्या मुलींच्या हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पुणे नाशिक महामार्ग आंदोलकांनी रोखलाय. आंदोलकांच्या दोन गट पडल्यानं महामार्गावरील आंदोलन मागे घेत त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलंय.

Rajgurunagar crime
Rajgurunagar Rain News | पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये जोरदार पाऊस, आंब्याला फटका

राजगुरूनगरमध्ये घडलेल्या प्रकरणी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली. तसंच या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सर्व प्रकरण जाणून घेतल्यानंतर आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली.

Rajgurunagar crime
Manoj Jarange Patil Rajgurunagar Sabha : जरांगंची राजगुरुनगरमध्ये सभा! पोलिस बंदोबस्त नेमका कसा?

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील राजगुरूनगर येथे घराजवळ खेळत असताना दोन चिमुकल्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर राजगुरूनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह एका पिंपामध्ये आढळून आले. दोन्ही बहिणी ८ आणि ९ वर्षांच्या होत्या.

पीडित कुटुंबाच्या घराजवळ एक आचारी राहायला आला होता. त्यानंच या दोन्ही मुलींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.

आरोपी आचाऱ्यानं गोड बोलून दोन्ही चिमुकल्यांना घराकडे नेलं. नंतर एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिनं विरोध केला, आरडाओरडा केला. आपलं बिंग फुटेल या भीतीनं आरोपीनं एकीचा जीव घेतला. तसंच दुसऱ्याही बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीनं पिंपामध्ये मृतदेह ठेवले आणि घरालगतच्या इमारतीजवळ पिंप ठेवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com