पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: नक्की पाडणार! पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी; भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Murlidhar Mohol News: एकीकडे मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची चर्चा सुरू असतानाच पुण्यामध्ये त्यांच्याविरोधात बॅनरबाजी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याआधीच पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ७ मार्च २०२४

Pune Loksabha Election 2024:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडी, महायुतीमध्ये जागा वाटपांवरुन वाद विवाद होत असतानाच आता इच्छुक उमेदवारांमध्येही कलगीतुरा रंगल्याचा पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी केल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. (Maharashtra Loksabha Election)

पुणे लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, आणि सुनील देवधर यांची नावे चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याबाबत चर्चा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. एकीकडे मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची चर्चा सुरू असतानाच पुण्यामध्ये त्यांच्याविरोधात बॅनरबाजी केल्याचे समोर आले आहे.

"स्टँडिंग दिली, महापौर दिले,, सरचिटणीस बनवलं, आता बास झालं तुला नक्की पाडणार, कष्टाळू भाजपा कार्यकर्ते" असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याआधीच पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.

काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी?

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते आमदार रविंद्र धंगेकर तसेच मोहन जोशी यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रविंद्र धंगेकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT