Pune Shaniwarwada News:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Breaking News: शनिवारवाड्यासमोर आढळली बेवारस बॅग! परिसरात खळबळ; बाँम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल

Pune Shaniwarwada News: पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर तात्काळ सर्व पर्यटकांना बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Gangappa Pujari

पुणे| ता. १ जून २०२४

पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर तात्काळ सर्व पर्यटकांना बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला. पोलिसांसह, बाँम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवार वाड्यासमोर एक बेवारस बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आज शनिवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. अशातच हा प्रकार घडल्याने भितीचे वातावरण पसरले.

या प्रकारानंतर खबरदारी म्हणून संपूर्ण शनिवार वाड्यातील पर्यटकांना बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस तसेच बाँम्ब शोध आणि बाँम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आणि शोध पथकाकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : महापारेषणचा बिघाड; महावितरणच्या ५२ हजार वीजग्राहकांना फटका, पिंपरी परिसरात रात्रीपासून अंधार

Maharashtra Live News Update : चार्जरच्या वायरनं नवऱ्याने केला बायकोचा खून, नवऱ्याने स्वत:लाही संपवलं

Political News : 'शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं, आधी...'; वसंत मोरे यांचं खासदार दुबे यांना ओपन चॅलेंज

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

GK: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

SCROLL FOR NEXT