Pune sassoon Hospital Latest News:  Saamtv
मुंबई/पुणे

Saam Impact : रुग्णाला निर्जनस्थळी सोडणारा ससूनचा डॉक्टर निलंबित, साम टीव्हीच्या बातमीचा दणका

Pune sassoon Hospital Latest News: ससून रुग्णालयामध्ये एका बेवारस रुग्णाला उपचाराऐवजी डॉक्टरानेच निर्जनस्थळी नेऊन सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले.

Gangappa Pujari

सागर आव्हाड| पुणे, ता. २३ जुलै २०२४

ससून रुग्णालयातील एका डॉक्टराने उपचारासाठी आलेल्या बेवारस रुग्णाला उपचाराऐवजी निर्जनस्थळी सोडून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. याबाबत आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून अखेर तो डॉक्टर निलंबित करण्यात आला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयामध्ये एका बेवारस रुग्णाला उपचाराऐवजी डॉक्टरानेच निर्जनस्थळी नेऊन सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी हे प्रकरण उघडकीस आणले, ज्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी केली होती. रविंद्र धंगेकर यांच्या या मागणीनंतर अखेर ससून हॉस्पिटलमधील डॉ आदीनाथ याला निलंबित करण्यात आले आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांना यासंबंधी अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी पत्र लिहले आहे.

याबतीत चौकशी लावली आहे ,चौकशी करून कारवाई करू. अद्याप लेखी तक्रार प्राप्त झाली नाही. व्हिडीओ व्हायरल झाला तो मिळाला आणि आम्ही चौकशी लावली, असे म्हणत संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earphone : जास्त हेडफोन वापरल्याने व्हाल बहिरे! कसा कराल सुरक्षित वापर

Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

Helmet Buying Tips: हेल्मेट घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवाच

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

SCROLL FOR NEXT