Pune Bopdev Ghat Case Saam TV
मुंबई/पुणे

Bopdev Ghat Case Update : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; २ आरोपींची ओळख परेड तर तिसरा फरार, तपास कुठपर्यंत आला?

Bopdev Ghat Case News: बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर तिसरा आरोपी फरार आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणातील आरोपींची ओळख परेड करण्यात आली आहे. यावेळी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राची उपस्थिती होती. या प्रकरणाच्या तपासाचा वेग पोलिसांनी वाढवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील येरवडा कारागृहामध्ये आरोपींची ओळख परेड, पीडित तरुणी आणि तिच्या मित्राची उपस्थिती होती. बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणाचा अटक केलेल्या दोन आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहामत स्वतंत्र चाचणी ओळख परेड घेण्यात आली. पीडित तरुणी आणि तिच्या मित्रांच्या उपस्थितीत दोन दिवस आरोपींची ओळख परेड घेण्यात आली.. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अत्तर उर्फ बाबू शेख आणि त्याचा साथीदार चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीसाठी पोलिसांचे अधिकार अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या हे आरोपी येरवडा कारागृहात आहेत.

या गुन्ह्यातील तपासाचा भाग म्हणून त्यांची ओळख परेड घेण्यात आली. त्यामध्ये आरोपी सारखे असलेले बारा जण उभे करून त्यातून आरोपींची पटवण्यात आली. या प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचा मित्र यावेळी उपस्थित होते. पुणेसह राज्यात खळबळ उडून दिलेली आहे. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे अकरा ते मध्यरात्री दीडच्या दरम्यान बोपदेव घाटातील टेबल पॉइंट येथे घडली होती.

पुण्यातील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. आता या प्रकरणाचा पोलिसांनी जलद गतीने सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT