Maval Kundamala Bridge Collapses Saam Tv News
मुंबई/पुणे

Maval Kundamala Bridge Collapses : मोठी बातमी! इंद्रायणी नदीवर पूल कोसळला, ६ जणांचा बुडून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Maval Bridge Collapses Over Indrayani River : पुण्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. आज रविवार असल्यानं पर्यटकांची गर्दी होती. अशातच ही दुर्घटना घटली आणि या घटनेत २० ते २४ पर्यटक बुडाल्याची माहिती मिळाली आहे. तर या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरु आहे. मात्र, या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार सुनील शेळके यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, या पुलावरून बाईक नेल्यानं त्यावर ओव्हरवेट झाल्यामुळे हा पूल कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajanta Caves History: महाराष्ट्रातील अजिंठा वेरुळ लेणीचा लेणी वास्तुकलेचा इतिहास माहिती आहे का?

Maharashtra Live News Update: यवतमाळ- नांदेड 'या' दोन जिल्ह्याचा संपर्क तुटला, पैनगंगा नदीला पूर

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

SCROLL FOR NEXT