Bhidewada
Bhidewada Saam
मुंबई/पुणे

Pune Bhidewada: भिडेवाड्याचा तिढा सुटला; सावित्रीबाई फुलेंचे स्मारक होण्याचा मार्ग मोकळा

Bharat Bhaskar Jadhav

Pune Bhidewada:

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पुणे महानगरपालिकेने आणि सरकारने जिंकलाय. मुलींच्या पायातील बेड्या तोडण्यासाठी ज्या ठिकाणी महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केली. तो वाडा अडगळीत आणि दुर्लक्षित झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने पुणे महापालिकेच्या बाजूने निकाल देत वाड्याचं भव्या स्मारकात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(Latest News)

स्मारक करण्याचा प्रश्न सुटला असून तातडीने काम सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरू केली. त्या भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकासाठीचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता. हा प्रश्न अखेर निकाली निघालाय.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली होती. त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’कडून केली जात होती. भिडे वाड्यात शाळा स्थापन होण्यास १९९८ मध्ये दीडशे वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, नितीन पवार यांनी फुलेवाडा ते भिडेवाडा अशी मिरवणूक काढली होती. त्या वेळेपासून हे स्मारक करावे, या मागणीने जोर धरला होता.

भिडेवाड्यात आता दोन गुंठे जागा राहिली आहे. त्यातील जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात होता. यामध्ये राज्य सरकारनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाडेकरूकडे उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाने ही याचिका तब्बल १० वर्षानंतर फेटाळत पुणे महापालिकेच्या बाजूने निकाल दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Diesel Rate (24th Feb 2024) : मध्यप्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर, महाराष्ट्रात इंधनाचा आजचा दर किती?

Hemant Patil On Reservation | मराठा आरक्षणावर हेमंत पाटील काय म्हणाले? | Marathi News

Yugendra Pawar शरद पवारांसोबतच ,पवारांसोबतचा फोटो केला ट्विट!| Marathi News

Car Accident News: भरधाव कार दुचाकीला धडकून झाडावर आदळली; भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

कालवा समितीच्या बैठकीनिमित्त Pune मध्ये काका-पुतण्या एकत्र!| Marathi News

SCROLL FOR NEXT