Baramati News  x
मुंबई/पुणे

लेक शाळेत पहिली आली, पण निकाल पाहायला तीच राहिली नाही; घरच्यांना अश्रू अनावर, कारण ठरले 'ते' गावगुंड, काय घडलं?

Pune Baramati News : पुण्याच्या बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील अंकिता कडाळेने आत्महत्या केली. ती दहावीत शिकत होती. काल दहावीचा निकाल लागला, तेव्हा ती विद्यालयात पहिली आल्याचे समोर आले.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील अंकिता कडाळे या मुलीने आत्महत्या केली होती. गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून तिने स्वत:ला संपवले होते. काल (१३ मे) दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. अंकिता विद्यालयात पहिली आली. तिला ७८.४० टक्के मिळाले आहेत. बोर्डामध्ये पास झाल्याचा आनंद साजरा करायला अंकिता नसल्याने गावात शोककळा पसरली आहे.

काल राज्यभरात दहावीचा निकाल जाहीर झाला. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावाच्या शाळेत अंकिता पहिली आली. निकाल पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. अंकिताच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. शाळेत प्रथम आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ती जगात नसल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

१५ वर्षीय अंकिता ही दहावीच्या वर्गात शिकत होती. गावातील विशाल गावडे, प्रवीण गावडे, शुभम गावडे आणि सुनील खोमणे हे तरुण अंकिताला धमक्या देत होते. पाठलाग करुन तिला मानसिकरित्या छळ करत होते. गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून अंकिताने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

'माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या घरच्यांना खल्लास करुन टाकेन' अशा धमक्या अंकिताला मिळत होत्या. चारही आरोपी शस्त्र दाखवून पीडितेच्या मनात दहशत निर्माण करत होते. वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला अंकिता कंटाळली होती. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कारवाई केली. यातील प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली होती. उरलेल्या तिघांना कधी अटक होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: हा विजय अजितदादांना समर्पित, अजितदादांच्या धेय्यधोरणांवर काम करणार - अनिकेत तटकरे

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT