Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: महिलेच्या पर्समध्ये सापडलं पिस्तुल अन् जिवंत काडतुसे, अघोरी पूजेसाठी...; पुणे एअरपोर्टवरुन ताब्यात

Pune Airport Crime News: पुणे विमानतळावर एका महिलेच्या बॅगेत पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली आहे. यानंतर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddhi Hande

पुणे विमानतळावर एका महिलेच्या बॅगमध्ये पिस्तूल सापडले आहे.ही महिला विमानात जाताना हे पिस्तूल घेऊन जात होती. तपासणी करताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैशाली वैभव दोशी (वय ४४) ही महिला बॅगेतून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन जात होती. ती "अघोरी विद्येची" पूजा करायची. तिला एका माणसाने ही पिस्तूल दिली होती, असं तिने सांगितले.

महिलेच्या बॅगेतू फक्त पिस्तूल नव्हे तर जिवंत काडतुसेदेखील सापडली आहेत. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पुणे विमानतळावर ही घटना घडली. वैशाली वैभव दोशी मूळची बारामतीची आहे. ती तंत्र विद्येचा व्यवसाय करते. ती पुण्यावरून इंदौरमार्गे दिल्लीला जात होती.

पुणे विमानतळावर बॅग तपासणीदरम्यान संशयास्पद "मेटल डिटेक्ट" झाल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले आणि बॅग उघडण्यास सांगितली. यावेळी तपासणी दरम्यान, त्यांच्या बॅग मध्ये १ पिस्तूल व जिवंत काडतुसे आढळून आले.

याप्रकरणी चौकशी केली असता त्यांना हे पिस्तूल त्यांच्या एका शिष्याने दिले होते आणि त्या जंगलात जाऊन पूजा करत असल्याने त्यांना याची गरज आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. अधिक चौकशीकेळी असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झालं आहे दोशी यांच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: घरासमोर खेळताना चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला, फरफटत नेत शरिराचे लचके तोडले; थरकाप उडवणारा VIDEO

Maharashtra Live News Update: - - अवघ्या १२ तासांत दोन हत्यांच्या घटनेनं नाशिक हादरलं

Shantanu Moghe: प्रिया नेहमी म्हणायची की…', प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेने व्यक्त केल्या भावना

Sameer Wankhede : समीर वानखेडे भडकले! शाहरुख खान, नेटफ्लिक्सवर मानहानीचा खटला, २ कोटींची केली मागणी

Ajit Pawar: अजित पवारांना महिलांचा वेढा; आम्हाला 1500 रुपये नको, रस्ता द्या|VIDEO

SCROLL FOR NEXT