शिरूर बायपासजवळ कंटेनर, कार, दुचाकी आणि बसचा भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून उद्योजक किशोर यादव यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह फरार झाल्याची माहिती आहे.
रोहिदास, गडगे, साम प्रतिनिधी
पुणे आहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ चार वाहनांचा भीषण अपघात झालाय. हा अपघात कंटेनर, कार दुचाकी आणि बस या वाहनांमध्ये अपघात घडला असून यात दोनजणाचा मृ्त्यू झालाय. मयत मध्ये वाडेगव्हाण येथील उद्योजक किशोर यादव यांचा समावेश आहे. तर कंटेनर चालक वाहन घेऊन फरार झालाय.
पुणे-आहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ चार वाहनांचा भीषण अपघात झालाय. हा अपघात कंटेनर, कार दुचाकी आणि बस या वाहनांमध्ये अपघात घडला असून यात दोनजणाचा मृ्त्यू झालाय. मयत मध्ये वाडेगव्हाण येथील उद्योजक किशोर यादव यांचा समावेश आहे. तर कंटेनर चालक वाहन घेऊन फरार झालाय.
कंटेनर, कार दुचाकी आणि बस यांच्यात अचानक धडक झाल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान अपघाताची माहिती होताच वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.