pune police saam tv
मुंबई/पुणे

पुणे जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! घायवळ टोळीनंतर आणखी एक टोळी पुणे पोलिसांच्या रडारवर; मोठी कारवाई

Pune Crime : पुण्यामधील आणखी एका टोळीवर कारवाई होणार असल्याचे म्हटले जात आहे. टिपू पठाण टोळीवर २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

  • पुण्यातील टिपू पठाण टोळीवर पोलिसांनी कारवाई

  • २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  • म्होरक्यासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Crime News : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात पुणे पोलीस आक्रमक झाले आहेत. पुण्यात घायवळ टोळीवर कारवाई सुरु आहे. टोळीचा म्होरक्या निलेश घायवळला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान अन्य टोळ्यांवरही कारवाई होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पुण्यातील टिपू पठाण टोळीवर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिझवान ऊर्फ टिपू पठाण टोळीने सय्यदनगर परिसरातील एका महिलेची जमीन बळकावण्यासाठी, जमिनीचा ताबा देण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या नऊ साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील कुर्ला नौपाडा येथील ३१ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टिपू सत्तार पठाण, सादिक कपूर, एजाज सत्तार पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेदगणी शेख, सद्दाम सलीम पठाण, साजिद झिब्राइल नदाफ, इरफान नासीर शेख, अजीम ऊर्फ अंट्या महम्मद शेख आणि मतीन हकीम सय्यद (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुर्ला नौपाडा येथे राहणाऱ्या महिलेच्या मालकीची जमीन हडपसर सय्यदनगर भागात आहे. पठाण टोळीने या जागेवर बेकायदा पत्र्याचे शेड उभारले. यानंतर त्यांनी ती जागा एकाला भाडेतत्त्वावर देऊन त्याच्याकडून दरमहा भाडे वसूल केले. तक्रारदार महिलेने जमीन रिकामी करण्याची मागणी केली.त्यावेळी पठाण ने तिला ‘२५ लाख रुपये दिल्यास ताबा सोडतो, अन्यथा पुन्हा या भागात पाय ठेवला तर जीवे मारू,’ अशी धमकी दिली. यापूर्वीही पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने पठाण टोळीच्या बेकायदा बांधकामावर कारवाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

Railway Rule: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! फक्त या प्रवाशांनाच मिळणार लोअर बर्थ तिकीट, वाचा सविस्तर

Maharashtra politics : ठाकरेंकडून शेलारांचं कौतुक; म्हणाले मोदी-शहांना खोटं ठरवत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं

Kurdai Bhaji: थोडं तिखट, झणझणीत आणि घरगुती चवीचं काहीतरी खायचंय? मग ही मराठवाडा स्टाईल कुरडई भाजी होऊन जाऊदेत

ISRO LVM3 Launch : भारताची ताकद वाढली, इस्रोची 'बाहुबली' झेप! LVM3 रॉकेटने रचला इतिहास |VIDEO

SCROLL FOR NEXT