Pune accident news Update  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात, दारूच्या नशेत तरूणाला चिरडले, जागेवरच मृत्यू

Pune accident news Update : पुण्यात हडपसर-सासवड रोडवर मध्यरात्री दारूच्या नशेत कार चालकाने तरुणाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव | पुणे प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Pune drunk driving accident Hadapsar Saswad road details : पुण्यात दारूच्या नशेतील एक कार चालकाने कारसमोर उभ्या असलेले तरुणाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास हडपसर सासवड रोडवर वडकीनाला येथे हा अपघात झाला. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी पाठलाग करून कार चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी कार चालकावर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केला आहे.

सागर बाळासाहेब सायकर ( वय ४० रा. शेवाळवाडी पुणे ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा गोपाळ कोईलवाड, ( वय ३० सध्या रा. संजय हरपळे यांच्याकडे भाड्याने भेकराईनगर फुरसुंगी पुणे मूळ रा. तालुका चाकूर जिल्हा लातूर ) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव आहे. या अपघातानंतर वडकीनाला येथे एकच गदारोळ माजला होता.

नेमकं झालं काय होतं?

दोन मिनी बस सासवड रोडवरून जात होत्या. त्यावेळी मिनी बसचालकाने कारला थांबवून पुढे जाऊ का दिले नाही? याचा जाब कार समोर उभा राहून विचारत होता. दारूच्या नशेतील चालकाने कार थेट बस चालकाच्या अंगावर घातली. बस चालकाला ७० मीटर फरफटात नेले आणि ते खाली पडल्यावर त्याच्या अंगावरून गाडी घातली. या घटनेत बस चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारपूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. .

सागर सायकर यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. सासवड येथील प्रवासी घेण्यासाठी दोन मिनी बस रविवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास शेवळवाडी येथून सासवडच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT