A shocking moment captured on camera as a youth is seen clinging to a car bonnet during a road rage incident in Pune. saam tv
मुंबई/पुणे

Shocking! पुण्यात महिला कार चालकाचं भयानक कृत्य; तरुणाला 2 किलोमीटर फरपटत नेलं|Video

Pune Accident News: पुण्यात एका महिला कार चालकाने एका तरुणाला जवळजवळ २ किलोमीटर ओढत नेलं. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे शहरात संतापाची लाट उसळलीय.

Bharat Jadhav

  • महिला कार चालकाने तरुणाला 2 किमी फरपटत नेलं

  • संपूर्ण प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद

  • तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्यात महिला कार चालकाने एका तरुणाला दोन किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा धक्कादायक प्रकार संगमवाडी रस्त्यावर घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार तरुण आणि कार चालक महिलेमध्ये वाद झाला होता. त्यानंतर महिलेनं त्या तरुणाला फरपटत नेलं. दोन किलोमीटर नेल्यानंतर महिलेनं कारला ब्रेक लावला. त्यामुळे तरुण गंभीर जखमी झालाय.

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार ज्या तरुणाला फरपटत नेलं तो तरुण देखील एक कार चालवत होता. त्याचा आणि महिला कार चालकाचा वाद झाला होता. त्यातून त्या तरुणाने कल्याणी नगरकडून येणाऱ्या चौकात महिलेच्या कारला आपल्या कारने अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो महिलेच्या कारसमोर उभा राहिला. त्यावेळी महिलेनं कारनं थांबवता तशीच दामटवली. तरुण बोनेटवरच बसून राहिला, महिलेने त्याला किमान २ किलोमीटर फरपटत नेलं. त्यानंतर ब्रेक लावला. त्यामुळे तरुण खाली पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

येरवडा येथील शादलबाबा दर्ग्याजवळ चारचाकीचा अपघात

येरवडा येथील शादलबाबा दर्ग्याजवळ रविवारी पहाटे पावणेतीन वाजता भरधाव चारचाकीचा अपघात झाला. वेगावर नियंत्रण सुटल्याने चारचाकी दुभाजकाला धडकून नंतर दर्ग्याजवळ खालच्या बाजूला असलेल्या दुकानांना जाऊन धडकली. यात चारचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एका दुकानाचेही नुकसान झाले आहे. यावेळी सर्व दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघाताचा थरार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. त्यावरून अपघाताचा घटनाक्रम, चारचाकीचा वेग व धडकेची तीव्रता दिसून येते. या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल वाहनचालकास अटक करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे.

टेम्पोची फुटपाथवरील अनेक वाहनांना धडक

पुण्यातील येरवडा परिसरात मोठा अपघात घडलाय. परिसरातील शहादल बाबा रोडवर भरघाव टेम्पोनं अनेक वाहनांना आणि फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी झाला होता. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, क्र. एमएच-१२-क्यूजी-४८९४ असा या टेम्पोचा नंबर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुकानाबाहेर भंगार ठेवल्याने वाद पेटला; व्यावसायिकासह वडिलांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Malegaon Politics: ज्यांच्या विरोधात लढले त्यांचाच मागितला पाठिंबा? मालेगावातील राजकारण ३६० डिग्री फिरणार

Besan Chilla Recipe : भाजी खाऊन कंटाळलात? मग ५ मिनिटांत बनवा बेसनाचा कुरकुरीत पोळा

Chum Chum Recipe: लाफ्टर शेफमध्ये दाखवलेली स्वादिष्ट चमचम मिठाई घरच्या घरी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Nashik Crime : पोलिसाची दादागिरी; वकिलाला डोके फुटेपर्यंत मारलं, VIDEO

SCROLL FOR NEXT