पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात
५० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
बेकायदेशीर केबलमुळे घटना घडल्याचा आरोप
पोलिसांकडून तपास सुरू
पुण्यातल्या पिंपरी-चिंचवडमध्ये वाय-फाय केबलमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीवरून जाणारी ही महिला रस्त्यावर लोंबणाऱ्या वायफाय केबलमध्ये अडकून खाली पडली. डोक्याला गंभीर दुखापत होऊन या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी केबल ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक 26 मध्ये ही घटना घडली. या ठिकाणी वाय-फायच्या केबलमध्ये अडकून दुचाकीने जाणारी महिलेचा अपघात झाला. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाला आणि तिचा मृत्यू झाला. संपदा पटवर्धन (५० वर्षे) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव होते. त्या गृहिणी होत्या. कामानिमित्त त्या दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली.
वाय-फाय केबलमध्ये अडकून अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या संपदा पटवर्धन यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. वाय-फाय केबल ऑपरेटरने सेक्टर 26 या ठिकाणी टाकलेल्या बेकायदेशीर केबलमुळे ही दुर्घटना घडली, असं मृतक संपदा पटवर्धन यांच्या नातेवाईकांचे म्हणणं आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अशाप्रकारे वाय-फाय केबल ऑपरेटर्सकडून नियमबाह्यपणे वाय-फाय केबलचे जाळे टाकले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे अपघात वारंवार घडण्याची शक्यता आहे. संपदा पटवर्धन यांच्या मृत्यूप्रकरणी सध्या निगडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र या प्रकरणात दोषी असलेल्या वाय- फाय केबल ऑपरेटर वरसदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.