ओडिशात बस-ट्रकची भीषण धडक
४ जणांचा मृत्यू, १२ हून अधिक जखमी
चुकीच्या लेनमुळे अपघात झाल्याची शक्यता
जखमींवर राउरकेला येथे उपचार सुरू
अपघाताचा तपास सुरू
Odisha Bus Truck Collides Accident 4 Dead News ओडिशामधून मोठी बातमी समोर आली आहे. सुंदरगड जिल्ह्यात मंगळवारी उशिरा रात्री भीषण अपघात झाला. चंडीपोश पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुसाबिरा परिसरात प्रवासी बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून, १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर राउरकेला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत असून मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही प्रवासी बस राउरकेलाहून जगतसिंगपूरकडे जात होती. रात्रीच्या अंधारात बस चुकीच्या लेनमध्ये गेल्याने समोरून येणाऱ्या ट्रकशी तिची जोरदार धडक झाली. या धडकेची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी भीषण परिस्थिती निर्माण झाली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि प्रवाशांनी मदतीसाठी एकच आरडाओरड सुरू केली.
या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बस चालक आणि वाहक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय एका प्रवाशाचाही मृत्यू झाला असून, मृतांची संख्या चारवर पोचली आहे. तसेच १२ प्रवासी जखमी आहेत. जखमींमध्ये काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. एका जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना राउरकेलाच्या आरजीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राउरकेलाचे पोलीस अधीक्षक नितेश वाधवानी यांनी सांगितले की, "रात्रीच्या अंधारात बस चुकीच्या लेनमध्ये गेल्यामुळे हा अपघात घडला असावा. बसमध्ये एकूण २० प्रवासी होते, त्यापैकी १२ जण जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांच्या चालकांचा मृत्यू झाल्यामुळे अपघाताचे नेमके कारण शोधणे कठीण झाले आहे. सध्या तपास सुरू आहे." या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासावर भर दिला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.