PUNE MULSHI ACCIDENT: RICKSHAW DRIVER DEAD, SHIV SENA LEADER INJURED Saam tv
मुंबई/पुणे

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! ठाकरेसेनेच्या नेत्याच्या कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

Pune Mulshi Accident News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची भीषण धडक. रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्यासह तिघे जखमी.

Alisha Khedekar

  • मुळशीतील चांदे-मूलखेड रस्त्यावर भीषण अपघात

  • रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू

  • शिवसेना जिल्हाप्रमुखांसह तिघे जखमी

  • फॉर्च्युनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून फॉर्च्युनरमधील तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ठाकरे सेनेच्या जिल्हाधिकारीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रिक्षाचालकाचे नाव विकास अर्जुन पारखी असे असून ते स्थानिक रहिवासी होते. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात चांदे-मूलखेड रस्त्यावर भरधाव येणाऱ्या फॉर्च्युनरची रिक्षाला जोरदार धडक बसल्याचे म्हटले जात आहे. या धडकेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच फॉर्चुनरमध्ये असलेल्या तिघांना गंभीर दुखापत झाली असून यामध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याचा देखील समावेश आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे असे त्यांचे नाव असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, फॉर्च्युनर गाडीत असलेल्या इतर जखमींचीही प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यास मदत केली. या प्रकरणी अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्युनर चालकाविरुद्ध मुळशीतील पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग आणि निष्काळजीपणा यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून नागरिकांना वाहन चालवताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आगामी काळात देशात महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊन लागू होऊ शकते - रक्षा खडसे

Vilas Ghule Case : खासदार बजरंग सोनावणे यांना मोठा झटका! विलास घुले हत्या प्रकरणात मुलाची होणार चौकशी

TV Actress : "मला एकटीला आत बोलावले अन्..."; चित्रपटासाठी प्रोड्युसरने अभिनेत्रीसमोर ठेवली घाणेरडी अट

Artery plaque: कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये साचलेली चरबी कमी करायचीये? डॉक्टरांनी सांगितले 6 सोपे उपाय

सुवर्णनगरीत सोन्या-चांदीचं दर बदलले! प्रति तोळा इतके झाले, चांदी थेट ३,००० रुपयांनी महागली; पाहा आजचे नवे दर

SCROLL FOR NEXT