Pune School Bus Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : पुण्यात मद्यधुंद बस चालकाचा थरार! ३० ते ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसने अनेक वाहनांना दिली धडक

Pune School Bus Accident News : पुण्यातील वाघोली परिसरात मद्यधुंद स्कूल बस चालकाने चार दुचाकी आणि एका कारला धडक दिली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. चालकाला अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • वाघोलीत मद्यधुंद स्कूल बस चालकाचा थरार

  • चार दुचाकी व एका कारला धडक

  • मोठी दुर्घटना टळली

  • चालक अटकेत; स्कूल बस सुरक्षेवर प्रश्न

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मद्यधुंद स्कूल बस चालकाने चार दुचाकी व एका कारला धडक देऊन काही अंतर फरफटत नेल्याची घटना काल दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील रोडवर घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान मद्यधुंद बसचालकाला स्थानिक नागरिकांनी धडा शिकवत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, बत्ता वसंत रसाळ ( वय ५० वर्षे, रा.वाघोली ) असे अटक केलेल्या बस चालकाचे नाव आहे. शाळेतील ३० ते ४० मुलांना बसमधून घेऊन घरी सोडण्यासाठी निघालेल्या एका बसचालकाने चार दुचाकी आणि एका कारला धडक दिली. त्यानंतर या बसचालकाने वाहने फरफटत नेली.

या धडकेत कोणीही जखमी झाले नसले तरी धक्कादायक म्हणजे हा बस चालक बस चालवताना मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रशांत भगवान धुमाळ (  वय-३६ ) यांनी फिर्याद दिली. बायफ रोडवरील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलची ही बस होती.

नागरिक ओरडा ओरडा करत त्याच्या पाठीमागे पळाले. त्यानंतर त्याने बस थांबविली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला चोपही दिला. त्या ठिकाणी गर्दी होऊन गोंधळ झाला. दरम्यान या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करा: संजय राऊत

Shocking: ९ वीच्या विद्यार्थिनीचे अपरहण करून सामूहिक बलात्कार, मानसिक धक्क्यातून मुलीची आत्महत्या

Maharashtra Live News Update : बारामतीत NDRF टीम दाखल; घटनास्थळी करणार पाहणी

Arijit Singh: 'बॉर्डर २'मुळे अरिजीत सिंगने सोडलं प्लेबॅक सिंगिंग; प्रसिद्ध निर्मात्याने सांगितलं खरं कारण

India Tourism : 'या' शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते, एकदा जाऊन नक्कीच भेट द्या

SCROLL FOR NEXT