Pune Nagar Highway Accident Saamtv
मुंबई/पुणे

Pune: दुर्दैवी! पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; २ वर्षीय चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Pune-Nagar Accident: एकाच कुटुंबातील चौघांना अपघातात जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Accident: पुणे नगर महामार्गावर फलके मळ्यानजीक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अपघात दोन वर्षाच्या लहान मुलीसह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News Update)

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे नगर महामार्गावर कारेगाव जवळ फलकेमळा येथे कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागच्या बाजूने इंडिका कारने जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.

ही धडक इतकी जोरदार होती की, या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील सर्व कुटुंब हे बीड जिल्ह्यातील आहेत, ज्यामघ्ये एका दोन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.

एकाच कुटूंबातील चौघांना अपघातात जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. असून मदतकार्यास सुरूवात झाली आहे. (Pune Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Samruddhi Mahamarg: महामार्गावर कार बंद पडली, मदतीसाठी शेतकरी धावून आले; भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Pune : पावसाचा झेंडूला फटका; पुण्यातील मार्केट यार्डमध्ये झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी गर्दी | VIDEO

Kolhapur Tragedy : अग्निशमन दलाच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू तर सहा जखमी

Shocking: पोटच्या गोळ्याचे भयानक कृत्य, दारूच्या नशेत आईची हत्या, बापालाही बेदम मारलं

SCROLL FOR NEXT