Bhor Car Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Bhor Car Accident News: घाटात फिरण्यासाठी गेले अन् मृत्यूने कवटाळलं; निरादेवघर धरणात कार कोसळून तिघांचा मृत्यू

पुण्यातील निरादेवघर धरणात कोर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

Ruchika Jadhav

प्राची कुलकर्णी

Pune Car Accident: आज सकाळपासूनच अपघाताच्या घटनांचे सत्र सुरू झाले आहे. बुलढाण्यातील मलकापूरात दोन खासगी बसचा भीषण अपघात झाल्यानंतर आता पुण्यातील निरादेवघर धरणात कार कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या कारमध्ये तीन प्रवासी प्रवास करत होते. या तिघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झालाय. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार,भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत एक कार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडली. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मोटारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते त्यापैकी एक जण बचावला असून तिघेजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघात ग्रस्त हे पुण्यातील रावेर येथील असल्याचे समोर आले आहे. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी रवाना झालेले आहेत. वरंधा घाटात सर्व वाहनांना बंदी असूनही आज पहाटे पुण्याहून ही कार घाटात गेली होती.

बुलढाण्यात दोन खासगी बसची समोरासमोर धडक; ६ प्रवाशांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात शनिवारी पहाटे अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटे ३ वाजेच्या सुमारास दोन खासगी ट्रॅव्हल्सची एकमेकांना जोरदार धडक बसली. दोन्ही वाहने वेगात असल्याने या धडकेत वाहनांचा बसचा पूर्णत: चक्काचूर झाला आहे. या अपघातात आतापर्यंत ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० जण जखमी असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT