पुणे शहरातील मध्यवर्ती भाग सदाशिव पेठेत एका भरधाव कारनं १२ जणांना उडवल्याची घटना घडलीय. ही घटना भावे हायस्कूल जवळ एका कारचालकाने १२ जणांना उडविल्याची घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय.
पुण्यात सदाशिव पेठेत एका भरधाव कारने चहाच्या टपरीवर उभ्या असलेल्या 12 जणांना उडवले. ज्यात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात चारजणाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित व्यक्तीच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
भावे हायस्कूलजवळ एका टपरीवजवळ काही विद्यार्थी चहा घेत होते. त्यावेळी एक कार रस्त्याच्या बाजूने येताना दिसते. कारचालकानं टर्न घेतला. पण कार सरळ थेट चहा टपरीत शिरली. यात ३ विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. यात एकाचा पाय फ्रॅक्चर झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, यात जखमी असलेले सर्वजण एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. यातील चौघांचे फ्रॅक्चर झाल्याने संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर उर्वरित जखमींना शेजारी योगेश रुग्णालयात दाखल केलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. युवा सेनेचे नेता शर्मिला येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बातचीत विद्यार्थ्यांशी करून दिली. विद्यार्थ्यांना जी मदत लागेल ती आम्ही करू, असा आश्वासन शिंदे यांनी दिला. तर आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून यातून काही मार्ग काढून या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का? याबाबत विचार करू असं सांगितलंय. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.
दरम्यान या अपघातामुळे विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सदाशिव पेठेत अपघाताची घटना घडलीय. या भागात अनेक अभ्यासिका आहेत. या दरम्यान आज (शुक्रवारी) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास काही विद्यार्थी श्री साईनाथ अमृततुल्य या चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी आले होते. त्याचदरम्यान एका कार चालकानं या विद्यार्थ्यांना उडवलं. यात ४ जणांचे पाय मोडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ गंभीर रुग्णांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर उर्वरित ९ जखमींना मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी एकाच्या पायाचं हाड मोडलं आहे. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई केली जातेय. घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी काय घडली याबाबत सविस्तर माहिती घेतली. घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.