अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Pune Sadashiv Peth drunk driver Case : पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी रात्री झालेल्या अपघात प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. चालक आणि गाडीच्या मालकालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कारचालकामुळे याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याला सुद्धा विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
जयराम शिवाजी मुळे असे कार चालकाचे नाव असून दिगंबर माधव शिंदे हा या गाडीचा मूळ मालक आहे. जयराम मुळे याच्यासोबत असलेला सहकारी राहुल गोसावी याला सुद्धा केली पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात १२ जणांना किरकोळ व गंभीर जखम झाली आहे. यामध्ये दोन स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या अपघाताप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे याने त्याच्या मालकीच्या कारची चावी निष्काळजीपणे तशीच गाडीला सोडून बाहेर गेला. त्यामुळे त्याचा सहकारी जयराम मुळे याने त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील त्याचा सहकारी राहुल गोसावी याच्यासोबत दारूच्या नशेत वाहन थेट सदाशिव पेठेत नेले. त्याने १२ जणांना उडवले. त्याला शनिवारी रात्रीच बेड्या ठोकण्यात आल्या.
चालक दारूच्या नशेत -
पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका भरधाव वेगात आलेल्या कार ने 12 जणांना उडवलं होतं. या प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणी नंतर स्पष्ट झालं आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५(ब), २८१ अन्वये आणि मोटार वेहिकल अॅक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल झालेल्या अपघातात ९ जण जखमी झाले होते तर यातील २ जण हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.