PSI Vijay Sagande death in Eknath Shinde escort team saam tv
मुंबई/पुणे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन; पोलिस दलात हळहळ

PSI Vijay Sagande Death In Eknath Shinde Escort Team: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकातील PSI विजय सागंडे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ठाण्यात त्यांना पोलिसांकडून शासकीय इतमामात अखेरची सलामी देण्यात आली.

Omkar Sonawane

विकास काटे, साम टीव्ही

ठाण्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे (वय 57) यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय सागंडे हे कामावर आल्यानंतर ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात होते. यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

विजय सागंडे हे गेल्या तीन वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत होते. ते डोंबिवलीतील पलावा सिटी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. सागंडे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यांच्या निधनानंतर पोलिसांकडून त्यांना बंदुकीच्या तोफेतून अखेरची सलामी देत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय परिसरात ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून मानवंदना आणि श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT