Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Police Bharti 2024 : पुण्यात पोलीस भरतीला विरोध कायम; सलग दुसऱ्या दिवशी दंडवत घालत आंदोलन

Protest Against Police Recruitment : 2022 या वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना वयांमुळे या भरतीतपासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी वय वाढवून मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

Ruchika Jadhav

सागर आव्हाड

महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण १७ हजार ४७१ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला आजपासून म्हणजेच १९ जूनपासून सुरूवात झालीये. दरम्यान, पुण्यात या भरतीला विरोध करण्यात येत आहे.

पोलीस भरतीला सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात येत आहे. सरकारविरोधात दंडवत घालत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पोलीस भरतीचे वय वाढवून मिळावे या मागणीसाठी पुण्यात रात्रभर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे.

सन 20-22 या वर्षाची पोलीस भरती 2024 मध्ये घेत आहे. त्यामुळे 2022 या वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना या भरतीतपासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी वय वाढवून मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

खासदार निलेश लंकेंचा विरोध

पोलीस भरतीला खासदार निलेश लंके यांनी देखील विरोध केला आहे. सध्या राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक विद्यार्थ्यांची तयारीही झालेली नाही. तसेच पावसामुळे विद्यार्थ्यांना काही अडचणींचा त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी लंकेंनी केली होती. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT