Shreya Maskar
मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी संगीत थेरपीचा वापर करा. आवडते आणि तणावमुक्त संगीत ऐका. ज्यामुळे तुमचे मन आणि डोके शांत होईल.
मेडिटेशन हा मानसिक आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे एकाग्रता वाढते. आपण सकारात्मक विचार करायला लागतो.
नियमित २०-२५ मिनिटे मेडिटेशन केल्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. मनातील नकारात्मक दूर होते.
शरीर आणि मन हेल्दी राहण्यासाठी दररोज सकाळी व्यायाम करा. यामुळे ताणतणाव, चिंता कमी होते. श्वसनाचा व्यायाम मानसिक आरोग्याला फायदेशीर ठरतो.
जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. रोज सकाळ, संध्याकाळ फिरायला जा. यामुळे डोळ्यांना हिरव्यागार नजारा पाहण्याची सवय लागते. मन नेहमी फ्रेश राहते. वाईट विचार येत नाही.
योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, लवचिकता आणि स्नायूंची ताकद वाढते, तसेच ताण कमी होतो आणि एकाग्रता सुधारते.
मानसिक आरोग्य नेहमी हेल्दी राहण्यासाठी कायम आपल्या आवडत्या गोष्टी करा. आपले छंद जोपासा. यामुळे आपण नेहमी आनंदी राहतो आणि आपले मन चांगल्या गोष्टींमध्ये गुंतलेले राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.