Shreya Maskar
स्किन केअर रूटिन नियमित फॉलो केल्यास तुमची त्वचा निरोगी राहील. स्किन केअरमध्ये दोन महत्त्वाचे पायऱ्या आहेत, ज्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत म्हणजे तुमची त्वचा कायम हेल्दी राहील.
डर्मेटोलॉजिस्टच्या मते, सकाळी उठल्यावर फेस क्लींजर वापरणे महत्त्वाचे आहे. चेहऱ्याला असे सीरम लावा ज्यात सॅलिसिलिक ॲसिड असावे. यामुळे चेहऱ्यावरील ओपन पोर्स स्वच्छ करते.
सॅलिसिलिक ॲसिडमुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते. पिंपल्स, मुरुम, मृत त्वचा यांची समस्या दूर होते. तसेच त्वचेची जळजळ कमी होते. यामुळे चमकदार त्वचा मिळते.
सीरमनंतर चेहर्याला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचेचे उन्हापासून संरक्षण होते. तसेच चेहरा काळा पडत नाही. चेहऱ्याला पोषण मिळते.
रात्री झोपण्यापूर्वी देखील हेच स्किन केअर रूटिन फॉलो करा. यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमची त्वचा मऊ मुलायम दिसेल.
त्वचा निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी रोज 3 लीटर पाणी प्या. जास्तीत जास्त फळ खा. त्वचेला मॉइश्चरायझर लावा. आहारात पालेभाज्यांचा समावेश करा.
सकाळी आणि संध्याकाळी आंघोळ केल्यावर नियमित बॉडी लोशन लावा. हिवाळ्यात याचा आवर्जून वापर करा. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.