Shreya Maskar
बाहेर फिरताना चेहरा उघडा ठेवू नका. धूळ आणि प्रदूषण तुमचा त्वचा खराब करते. त्यामुळे नियमित स्किन केअर करायला विसरू नका.
बाहेर आल्यावर थेट तोंड धुवू नका. पहिले क्लींजिंग ऑइलने चेहरा स्वच्छ करा आणि मेकअप काढून टाका. त्यानंतर तुमच्या स्किन टाइपनुसार योग्य असलेल्या फेस वॉशने चेहरा धुवा. यामुळे त्वचा ब्रेकआउट्सची शक्यता कमी होते.
त्वचा मुलायम ठेवण्यासाठी आठवड्यातून १-२ वेळा एक्सफोलिएशन करणे आवश्यक आहे. यामुळे मृत त्वचा काढून टाकली जाते आणि नवीन त्वचा सुंदर दिसते. यासाठी सौम्य स्क्रबचा वापर करा.
आठवड्यातून एकदा फेस मास्क लावणे त्वचेसाठी फायदेशीर आहे. प्रदूषण आणि जास्त मेकअपचे परिणाम कमी करण्यासाठी सल्फर आधारित मास्क चेहऱ्याला लावा. तेलकट त्वचेसाठी हे फायदेशीर आहे.
त्वचा निस्तेज दिसू लागली असेल तर महिन्यातून दोनदा घरीच फेशियल करा. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि तुमचा चेहरा ताजा दिसतो.
चांगल्या त्वचेसाठी वर्षाचे 12 महिने त्वचेला सनस्क्रीन, मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. ते तुमचे प्रदूषणामुळे होणारे त्वचेचे नुकसान कमी करण्यास देखील मदत करते. घरात असतानाही हलके सनस्क्रीन लावणे फायदेशीर आहे.
रात्रीच्या वेळी त्वचेवर हलके फेशियल ऑइल लावल्याने चेहरा अधिक हायड्रेट, मुलायम , निरोगी होतो. हानिकारक घटक त्वचेत प्रवेश करण्यापासून रोखतात.
नियमित स्किन केअर केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या, टॅनिंग कमी होते आणि तुम्हा नैसर्गिक चमकदार त्वचा मिळते.