Priyanka chaturvedi saam tv
मुंबई/पुणे

Priyanka Chaturvedi : श्रीकांत शिंदेंवर ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींची जहरी टीका, शिवसेनेनं चौफेर घेरल्या

Shinde group on Priyanka Chaturvedi : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी श्रीकांत शिंदेंवर जहरी टीका केली. या टीकेमुळं शिवसेनेनं त्यांना चौफेर घेरलंय.

Vishal Gangurde

मयुर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारसभेत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर तुफान टीका केली. ठाकरे गटाच्या या उमेदवाराच्या प्रचारासाठी झालेल्या या सभेत प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे पिता-पुत्रावर जोरदार टीका केली. 'श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर 'मेरा बाप गद्दार है' लिहिलंय; अशा शब्दात प्रियांका चतुर्वेदी यांनी टीका केली. या टीकेनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी चतुर्वेदींना चौफेर घेरलं आहे.

मुंबईतील घाटकोपरमध्ये ईशान्य लोकसभा मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासाठी प्रचारसभा झाली. या सभेत यांका चतुर्वेदी आणि नितीन बानगुडे पाटील यांची भाषणे झाली. या सभेत प्रियांका चतुर्वेदी यांनी एका सिनेमााचा दाखला देत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर 'मेरा बाप गद्दार है' असे लिहिलं आहे, अशी टीका केली. प्रियांका चतुर्वेदी यांच्या टीकेनंतर शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्योती वाघमारेंची प्रियांका चतुर्वेदींवर जोरदार टीका

ज्याती वाघमारे यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. 'त्यांनी गद्दारी विषयी बोलणं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली हा प्रकार आहे. त्या खासदारकीसाठी काँग्रेस सोडून शिवसेनेत आल्या आहेत. तुम्ही असं काय योगदान दिलं, हे माहीत नाही. पण उद्धव ठाकरेंनी तुम्हाला लगेच खासदारकी दिली.

'प्रियांका चतुर्वेदी दीवार चित्रपटाचं उदाहरण देता, पण आम्ही तुम्हाला सुनील शेट्टीच्या गोपीकिशन चित्रपटाचं उदाहरण देतो. त्यात एक डायलॉग आहे मेरे दो - दो बाप... आम्ही तुम्हाला पण हेच म्हणायचं का? आमचे संस्कार त्याची परवानगी आम्हाला देत नाही, अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केली.

विश्वनाथ भोईर यांची प्रियंका चतुर्वेदीवर घणाघाती टीका

प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेल्या टीकेला विश्वनाथ भोईर यांनी घणाघाती टीका केली आहे. 'तुम्ही स्वत:च्या खासदारकीसाठी किती ठिकाणी फिरल्या, कुठे कुठे गेल्या, याचा आधी विचार करावा. त्यानंतर दुसऱ्याकडे बोट दाखवावं, असा टोला शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

SCROLL FOR NEXT