Ambernath News Saam Tv
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून १० लाखांचं सोनं लुटलं

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अजय दुधाणे

अंबरनाथ -पोलीस (Police) असल्याची बतावणी करून हातचलाखीने सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या (Ambernath) शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विशेष म्हणजे यात १० लाखांचं सोनं घेऊन चोर पसार झाले आहेत.

वसार गावातील बांधकाम व्यावसायिक रमेश शेलार यांच्या सोबत हा प्रकार घडला आहे. १५ जून रोजी सकाळी ७ वाजता शेलार हे त्यांच्या पालेगाव रोड येथील वीटभट्टीवर कामानिमित्त जात होते. एका बाईकवर स्वार दोन व्यक्तींनी त्यांना भररस्त्यात अडवून आम्ही पोलीस आहोत, गाडीचे पेपर आहेत का? एवढं सोनं घालून तुम्ही का फिरताय? आधीच चोरीचे प्रकार किती वाढले आहेत, अशी बतावणी करून शेलार यांना दम भरला. त्याच दरम्यान अजून एका बाईकस्वाराला अडवून त्याचीही त्यांनी चौकशी केली.

हे देखील पाहा -

मात्र तोही व्यक्तीही त्यांच्यासोबतचाच असल्याचं सीसीटीव्हीत निष्पन्न झालं. त्यानंतर शेलार यांना सोनं काढून तुमच्या खिश्यात ठेवा, असं त्यांनी सांगितले. त्याच दरम्यान एका चोरट्याने शेलार यांना बोलण्यात गुंतवून ठेवत शेलार यांच्याकडील तब्बल १० लाखांचं सोनं घेऊन पसार झाले. हे चोर नेवाळी पाईपलाईन दिशेने पसार झाले असून त्यांचा शोध सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे शिवाजीनगर पोलीस घेत आहेत.

आता याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेवरून तरी आता गावकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं परिधान करताना दक्षता घेण्याची गरज व्यक्त होते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Needle-free injection Nagpur: सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! नागपुरात मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT