Sachin Waze, Parambir Singh, Anil Deshmukh Saam Tv
मुंबई/पुणे

वाझेंना सेवेत घेण्यासाठी 'तीन मंत्र्यांचा' दबाव- सिंग; मंत्र्यांची नावं समोर

सचिन वाझेंना चांगल्या पोस्टवर घेण्यासाठीही मंत्री दबाव टाकत होते.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: सचिन वाझेंना (Sachin Waze) पुन्हा सेवेत घेण्यासाठी माझ्यावर तीन मंत्र्याचा दबाव होता असा गौप्ययस्पोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीस सिंग (Parambir Singh) यांनी ईडीसमोर केला आहे. मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री, आणि पर्यावरण मंत्र्यांचा माझ्यावर दबाव होता अशी धक्कादायक माहिती परमबीर सिंग यांनी ईडीला दिली आहे. सचिन वाझेंना सेवेत घेण्यासाठी आदित्या ठाकरेंनी (Aaditya Thackeray) सुचना दिल्याचा जबाब परमबीर सिंग यांनी ईडी समोर नोंदवला आहे. एवढचं नाहीतर सचिन वाझेंना चांगल्या पोस्टवर घेण्यासाठीही मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्र्यांचा दबाव होता अशी सर्व माहिती परमबीर सिंग यांनी ईडीसमोर दिली आहे. (Sachin Waze Latest News Updates)

पोलीस बंदल्यांची यादी अनिल परब आपल्याला देत होते. कोणत्या अधिकाऱ्याला कुठे बदली हवीये याची यादी स्वत: अनिल परब आपल्याला देत असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी नोंदवलेल्या जबाबातून समोर आली आहे. अनिल परब यांनी दिलेलीच यादी मी मुख्य सचिवांना दिली असं अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत भर पडत आहे. गोरेगाव कथित खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत आज परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल दाखल करण्यात आले होते. गुन्हे शाखा युनिट 11 संबंधित कारवाई करत आहे या आरोपपत्रात सचिन वाझे यांच्यासह आणखी काही नावांचा देखील समावेश आहे. गोरेगाव खंडणी प्रकरणात आतापर्यंतएकूण 6 आरोपी आहेत. परमबीर सिंग, सचिन वाझे, रियाझ भाटी, विनय सिंग, अल्पेश आणि चिंटू अशी प्रमुख आरोपींची नवे आहेत. किला कोर्टात 1 हजार 895 पानांच दोषारोपपत्र जबाबासहित दाखल करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुख आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

SCROLL FOR NEXT