उल्हासनगरच्या ४ अग्निशमन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगरच्या ४ अग्निशमन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

अग्निशमन दलाच्या या चार कर्मचाऱ्यांनी इमारत पडण्यापूर्वीच १३५ लोकांना बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला होता. देशातील २५ पुरस्कार विजेत्यांमध्ये उल्हासनगरचे हे चौघेजण आहेत.

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या (ulhasnagar municipal corporation) अग्निशमन दलातील (Fire brigade) ४ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार (President's Bravery Award) जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या (independence day) पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या पुरस्कारांमुळे उल्हासनगर (ulhasnagar) शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. (President's Bravery Award to 4 firefighters of Ulhasnagar)

हे देखील पहा -

उल्हासनगर शहरातील मेहक अपार्टमेंट (mahek apartment ulhasnagar) या इमारतीला २०१९ साली तडे जाऊन ही इमारत एका बाजूला कलली होती. या इमारतीतून अग्निशमन दलाने 135 रहिवाशांना बाहेर काढलं आणि त्यानंतर काही क्षणातच ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. या कामगिरीसह उल्हासनगर शहरात अनेकदा घडलेल्या इमारत कोसळण्याच्या दुर्घटना, त्यामध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने केलेलं रेस्क्यू ऑपरेशन, या सगळ्याची दखल घेत उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलातील चार कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

सहाय्यक स्टेशन ऑफिसर बाळासाहेब नेटके (balasaheb netake) यांच्यासह फायरमॅन पंकज पवार (pankaj pawar), संदीप आसेकर (sandip aasekar) आणि राजेंद्र राजम (rajendra rajam) या चौघांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी देशातून सिविल सर्विसेस मधील २५ जणांची निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातले ८, तर उल्हासनगरचे चौघे आहेत. त्यामुळे उल्हासनगर शहरात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. हा पुरस्कार जाहीर होताच उल्हासनगर महापालिकेचे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी सभागृहनेते धनंजय बोडारे (dhananjay bodare - shivsena) यांनी या चौघांचा सत्कार करत आनंद व्यक्त केला.

यावेळी हा पुरस्कार म्हणजे शहरासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया धनंजय बोडारे यांनी व्यक्त केली. तर हा पुरस्कार म्हणजे आमच्या आजवरच्या मेहनतीचं चीज असून त्याचं वर्णन शब्दात करता येण्यासारखं नसल्याची प्रतिक्रिया सहाय्यक स्टेशन ऑफिसर बाळासाहेब नेटके यांनी व्यक्त केली. यावेळी प्रतिक्रिया देताना बाळासाहेब नेटके यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. या पुरस्कारानंतर उल्हासनगर शहरातून अग्निशमन दलाच्या या चार जाबाँज कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT