Independence Day 2021: देशातील 1380 पोलीसांना शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर

जम्मू -काश्मीर पोलिसांना सर्वाधिक 275 पदके
Independence Day 2021: देशातील 1380 पोलीसांना शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर
Independence Day 2021: देशातील 1380 पोलीसांना शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर Saam tv news
Published On

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (75th Independence Day) रविवारी देशभरातील एकूण 1,380 पोलिसांना शौर्य आणि विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदकांनी सन्मानित केले जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मते, यातील 2 पोलिसांना शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक, 628 पोलीस कर्मचाऱ्यांना केलेल्या शौर्यासाठी (Police Medal for Gallantry) पोलीस पदक देण्यात येईल. यासह, 88 पोलिसांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (Presidential Police Medal) आणि उत्कृष्ट सेवेसाठी 662 पोलीसांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

जम्मू -काश्मीर पोलीस दलातील एसआय अमरदीप आणि सीआरपीएफचे जवान सुनील दत्तात्रेय काळे (मरणोत्तर) यांना शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने (President’s Police Medal for Gallantry) सन्मानित केले जाईल. तसेच यावर्षी जम्मू -काश्मीरच्या एकूण 275 पोलिसांना त्यांच्या शौर्य आणि सेवेसाठी सन्मानित केले जाणार आहे. तर, दुसरीकडे, जम्मू -काश्मीर पोलिस दलातील 256, सीआरपीएफचे 150, आयटीबीपीचे 23, ओडिशा पोलिसांचे 67, महाराष्ट्रातील 25, छत्तीसगडचे 21 आणि इतर राज्यांतील पोलिसांनाही शौर्य पदकांनी गौरवण्यात येणार आहे.

Independence Day 2021: देशातील 1380 पोलीसांना शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर
बैलगाडा शर्यतीवरून राजकारण सुरू

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्याचे भुमीपुत्र, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, अतिरिक्त पोलीस महासंचालक, आशुतोष डुंबरे यांनाही उल्लेखनीय कामगिरी आणि अतिविशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. तर, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलातील (ITBP) एकूण 23 जवानांपैकी 20 जवानांना मे-जून, 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकींमध्ये शौर्यासाठी पुरस्कार देण्यात आले आहेत. आयटीबीपीच्या जवानांना शौर्यासाठी समोरासमोर चकमकी/ सीमा रक्षण कर्तव्यांमध्ये बहाल करण्यात आलेली ही सर्वात अधिक देण्यात आलेली शौर्य पदके आहेत.

ITBP नुसार, 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यातील 8 जवानांना शौर्य, उच्च स्तरीय धोरण, रणनीतिक अंतर्दृष्टी आणि मातृभूमीच्या संरक्षणासाठी पीएमजी प्रदान करण्यात आले आहे. 18 मे 2020 रोजी फिंगर 4 परिसरात झालेल्या चकमकीदरम्यान केलेल्या शौर्यासाठी 6 जवानांना पीएमजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर लडाखमध्येच हॉट स्प्रिंग्जजवळ शौर्यपूर्ण कृतीसाठी 6 जवानांना पीएमजी देण्यात आले. याशिवाय, छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवायांमध्ये केलेल्या कामगिरीसाठी 3 जवानांना पीएमजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com