Presidential Election 2022 News, Sharad Pawar latest News
Presidential Election 2022 News, Sharad Pawar latest News Saam Tv
मुंबई/पुणे

राष्ट्रपतिपदासाठी शरद पवारांचे नाव निश्चित झालं तर..., काँग्रेस नेत्याने स्पष्टच सांगितलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची (Election) चर्चा सुरू झाली आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबईत भेट घेतली आहे. युपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही या संदर्भात वक्तव्य केले आहे. (Presidential Election Sharad Pawar)

युपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव निश्चित झाले तर आमचे समर्थन असणार, असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षानेही शरद पवार यांच्या नावाला समर्थन दाखवले आहे. जुलै महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. (Sharad Pawar latest News)

काही दिवसापूर्वी युपीएच्या अध्यक्ष पदावरुन शरद पवार (Sharad Pawar) यांचे नावे पुढे आले होते. राष्ट्रपती पदाच्या चर्चांवर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, देशाच्या मोठ्या पदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा होते, याचा आनंद आहे. शरद पवार यांनी याअगोदर आमच्या पक्षाच्या मर्यादा संबंधी स्पष्ट केले आहे, राष्ट्रपती पदाविषयी अजुनही पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही.

राष्ट्रपती निवडणुकीवर मुंबईत खलबते

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा निरोप घेऊन मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. सर्व पक्षांची बैठक घेऊन एक उमेदवार निवडण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे , टीएमसी, समाजवादी पक्ष या सर्वांसोबत चर्चा करण्यासाठी सांगितले असल्याचे बोलले जात आहे. वेळ आणि दिवस ठरवून तारीख घेऊ आणि बैठक घेऊ, असंही खरगे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

SCROLL FOR NEXT